ZP New Building
sakal
नाशिक: जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतून मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्यासह त्यांच्याशी निगडित विभागांचे कामकाज सोमवार (ता. १७)पासून सुरू झाले आहे. सर्व साहित्य, कागदपत्रे आणि फायलींची सांगड घालत कर्मचाऱ्यांचा दिवस गेला. यादरम्यान अधिकाऱ्यांनी मागविलेल्या काही फाईली सापडेना, म्हणून शिपायांची चांगलीच दमछाक झाली. इमारत पूर्ण झाली असली, तरी काही उणिवा कायम असून, त्या युद्धपातळीवर दूर करण्याचे काम आजही सुरू होते.