नाशिक: राज्यातील पंचायत विकास निर्देशांक अंतर्गत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल नाशिक जिल्हा परिषदेचा राज्याचे ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे व प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी हा सन्मान स्वीकारला.