Nashik Zilla Parishad
sakal
नाशिक: जिल्हा परिषद व पंधरा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गट-गणांसाठी प्रारूप मतदार याद्यांची बुधवारी (ता. ८) प्रसिद्धी होणार आहे. तसेच २७ ऑक्टोबरला अंतिम याद्यांची प्रसिद्धी केली जाईल. देशपातळीवर सध्या मतदार याद्यांमधील गोंधळाचा मुद्दा गाजत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत या मुद्यावरून फटका बसायला नको म्हणून इच्छुक अलर्ट झाले आहेत.