नाशिक: साडेतीन वर्षांपासून प्रतीक्षा लागून असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण ग्रामविकास विभागाने जाहीर केले आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे आगामी अध्यक्ष हे सर्वसाधारण (खुल्या) गटातील असतील. त्यामुळे अध्यक्षपद मिळविण्यासाठी सर्वच पक्षाच्या इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.