नाशिक- जिल्हा परिषदेतील तीन विभागप्रमुखांविरोधात महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्यानंतर विशाखा समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत मंगळवारी (ता. १) नाशिक पंचायत समितीच्या कार्यालयात दिवसभर चौकशी केली. मात्र, या चौकशीविषयी अधिकृत माहिती मागवली असता समितीने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.