Nashik Zilla Parishad
sakal
नाशिक: एकल महिलांच्या आयुष्यातील दु:ख कमी करण्याच्या हेतूने त्यांचा पुनर्विवाह घडवून आणण्यासाठी जिल्हा परिषदेने घेतलेला पुढाकार त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. रविवारी (ता. १४) आयोजित पहिल्याच वधू-वर मेळाव्याला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे प्रशासनाला हा मेळावा स्थगित करण्याची नामुष्की ओढवली. नागरिकांपर्यंत हा निरोपच न पोचल्याने रविवारी जिल्हा परिषदेत विवाहेच्छू वधू-वरांची तोबा गर्दी झाल्याने एकच सावळा गोंधळ उडाला.