Zilla Parishad
sakal
नाशिक: जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात दरमहा सुमारे एक ते दीड लाख रुपयांपर्यंत विजेचे बिल भरावे लागत होते. त्यामुळे जिल्हा परिषदेला स्वनिधीतून दरवर्षी सुमारे १६ लाख रुपयांची तरतूद करावी लागत होती. मात्र, आता नवीन इमारतीवर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सौरऊर्जा प्रणाली (सोलर सिस्टिम) बसविण्यात येणार असल्याने दरवर्षीचा हा मोठा खर्च वाचणार आहे.