नाशिक- मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समितींच्या नवीन गणरचनेनंतर निफाड तालुक्याचे राजकीय वर्चस्व कमी झाले असून मालेगाव तालुक्याचे वर्चस्व वाढले आहे. यापूर्वी दहा गट असलेल्या निफाड तालुक्यात आता आठ गट राहिले आहेत, तर मालेगावमध्ये एका गटाची वाढ होऊन आठ गट झाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत या दोन तालुक्यांमधील वर्चस्व स्पष्टपणे दिसून येण्याची शक्यता आहे.