World Water Day | हर घर जल गाव व हागणदारीमुक्त-अधिक गावांची घोषणा करावी : ZP CEO आशिमा मित्तल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ZP CEO Ashima Mittal, Nashik News

World Water Day | हर घर जल गाव व हागणदारीमुक्त-अधिक गावांची घोषणा करावी : ZP CEO आशिमा मित्तल

नाशिक : जागतिक जल दिन २२ मार्चचे औचित्य साधून ज्या गावांमध्ये जल जीवन मिशनचे काम पूर्ण झाले ते गाव हर घर जल घोषित करावे.

तसेच हागणदारी मुक्त अधिक गावाच्या निकषाची पूर्तता करणाऱ्या गावास हागणदारीमुक्त अधिक गाव म्हणून घोषित करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यंत्रणेस दिले आहेत. (ZP CEO Ashima Mittal statement Every Ghar Jal Gaon and Hagandari Mukta should be announced Nashik News)

जागतिक जल दिनानिमित्त केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभागाने जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियानांतर्गत कामे पूर्ण झालेल्या गावांना हर घर जल गाव व हागणदारीमुक्त अधिक गाव म्हणून घोषित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जल जीवन मिशनच्या निकषानुसार गावातील कार्यात्मक घरगुती नळ जोडणी तसेच शाळा, अंगणवाडी, मिशन या सार्वजनिक संस्थांना नळजोडणी पूर्ण केलेल्या व नळ जोडणी द्वारे नियमित पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या गावांना हर घर जल म्हणून घोषित करण्यात येते.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

तसेच हागणदारीमुक्त अधिक गाव अंतर्गत शौचालयांचा नियमित् वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन या निकषांची पूर्तता केल्यास गाव हागणदारीमुक्त अधिक म्हणून घोषित करण्यात येते. त्यानुसार नाशिक जिल्हयात आत्तापर्यंत १०२ गाव हर घर जल म्हणून तर २०८ गाव हागणदारीमुक्त अधिक म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

जलदिनाच्या अनुषंगाने निकष पूर्ण करत असलेल्या गावांना हर घर जल व हागणदारीमुक्त अधिक गाव म्हणून गाव घोषित करण्याचे आवाहन आशिमा मित्तल यांनी केले आहे. या बाबत सर्व गटविकास अधिकारी यांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :NashikZP