Employees Biometric Attendance: ZP CEO करणार कर्मचाऱ्यांच्या बायोमेट्रीक हजेरीची पडताळणी!

ZP CEO Ashima Mittal watch Employees Biometric Attendance
ZP CEO Ashima Mittal watch Employees Biometric Attendanceesakal

ZP Employees Biometric Attendance : जिल्हा परिषदेतील विविध विभागात कर्मचारी कार्यालयीन वेळात हजर राहत नसल्याप्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी गंभीर दखल घेतली आहे. स्वतःच कर्मचाऱ्यांची हजेरी घेणे सुरू केले आहे.

प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांची सकाळ आणि सायंकाळची हजेरी पत्रक मागविले जात असून त्यांची पडताळणी केली जात आहे. या हजेरी सक्तीमुळे कर्मचाऱ्यांची धावपळ होत आहे. (ZP CEO ashima mittal will verify biometric attendance of employees nashik news)

जिल्हा सरकारी व परिषद सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या कामात कर्मचारी कार्यालयीन वेळात दिसत असल्याचे ‘सकाळ’ ने वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी दखल घेत, कार्यालयीन वेळात निवडणुकीच्या प्रचारात सापडल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी काढले.

यावरच न थांबता मित्तल यांनी कर्मचाऱ्यांची हजेरी घेणे सुरू केले आहे. अनेक कर्मचारी केवळ हजेरी लावत असल्याचे दिसून येत असल्याने कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन त्यांची पडताळणी करून हे हजेरी पत्रक कार्यालयात दाखल करण्याचे आदेश मित्तल यांनी काढले आहेत.

प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांची सकाळी सव्वादहाला झालेली हजेरी (इन) त्यानंतर सायंकाळी सव्वासहाला असलेली हजेरी (आऊट) विभागाने घेऊन, त्यांची प्रत्यक्ष पडताळणी करावयाची. हे पडताळणी झाल्यानंतर कोण वेळात आले, उशिराने आले, गैरहजर कोण याची नोंद करून सादर करायची आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ZP CEO Ashima Mittal watch Employees Biometric Attendance
Nashik News: कार्यालयीन वेळात ZP कर्मचारी निवडणूक प्रचारात व्यस्त! नियमित कामकाजावरही होत आहे परिणाम

या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी सर्व विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांची बैठक घेतली. यात सर्व विभागांनी दररोज हजेरी पत्रक सादर करावयाचे याबाबत सूचना दिल्या.

टेबल सोडण्यापूर्वी देखील, संबंधितांना सांगणे बंधनकारक केले असून त्यांच्या परवानगी शिवाय विभागाबाहेर देखील जाता येणार नसल्याचा नियम करण्यात आला आहे.

बदली कर्मचाऱ्यांची अडचण

नियमित बदल्या तसेच, अंतर्गत बदली प्रक्रिया झालेली असल्याने अनेक कर्मचाऱ्यांची मुख्यालयातून बाहेर तसेच, तालुकास्तरावरून मुख्यालयात बदली झालेली आहे. या बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची बायोमेट्रीक मशिनमध्ये अद्याप हजेरी अद्ययावत झालेली नाही.

काही कर्मचाऱ्यांना तालुका व मुख्यालय असे पदभार देखील देण्यात आलेले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची हजेरीबाबत मोठी अडचण होत आहे. त्यासाठी त्यांना कालावधी देण्यात आला आहे.

ZP CEO Ashima Mittal watch Employees Biometric Attendance
SAKAL Impact: कार्यालयीन वेळात प्रचारात दिसल्यास शिस्तभंग ठरणार! ZP CEO मित्तल यांचा कर्मचाऱ्यांना दणका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com