ZP माजी अध्यक्ष अन उपाध्यक्षांसह सभापतींची हुकली संधी

ZP election Nashik news
ZP election Nashik newsesakal

नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर (ZP Reservation Draw) माजी अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापती अन ‘शाऊटिंग ब्रिगेड' म्हणून ओळख निर्माण केलेल्या माजी सदस्यांना पुन्हा लढण्याची संधी मिळणार नाही.

त्यामध्ये बाळासाहेब क्षीरसागर, शीतल सांगळे, जयश्री पवार, डॉ. सयाजीराव गायकवाड, नयना गावित, संजय बनकर, अश्‍विनी आहेर, अपर्णा खोसकर, किरण थोरे, उदय जाधव, डॉ. कलावती चव्हाण यांच्यासह डॉ. आत्माराम कुंभार्डे, सिद्धार्थ वनारसे, रमेश बोरसे, महेंद्रकुमार काले, शंकरराव धनवटे, अमृता पवार आदींचा समावेश आहे. (ZP ex president vice president loss chances zp election reservation draw Latest Marathi News)

मावळत्या सभागृहातील ७३ सदस्यांपैकी नितीन पवार, हिरामण खोसकर हे विधीमंडळाच्या सभागृहात पोचले आहेत. मात्र उर्वरित माजी सदस्यांपैकी ५३ सदस्यांना गट राहिलेला नाही. जवळपास १७ माजी सदस्य हे गट बदलून अथवा आरक्षणाऐवजी सर्वसाधारण जागेवरून पुन्हा निवडणूक लढविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामध्ये माजी सभापती सुरेखा दराडे, मंदाकिनी बनकर, रुपांजली माळेकर, सुशीला मेंगाळ, नयना गावित, वैशाली खुळे, सीमंतिनी कोकाटे, गणेश अहिरे, यतींद्र पगार, साधना गवळी, बलवीर कौर निर्मल गिल, मनिषा पवार, यशवंत गवळी, ज्योती जाधव, भास्कर गावित, हेमलता गावित, अशोक टोंगारे, सुनीता चारोस्कर यांचा समावेश असू शकेल.

त्याचवेळी माजी सदस्यांसह पदाधिकाऱ्यांप्रमाणे राजकीय घराण्यांमधील पुढील पिढीमध्ये निवडणूक लढविण्याची आशा बळावली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा मुलगा गोकूळ, खासदार हेमंत गोडसे यांच्या स्नुषा भक्ती गोडसे, माजी आमदार धनराज महाले यांचा मुलगा वैभव, आमदार नितीन पवार यांचा मुलगा ऋषीकेश, माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांचा मुलगा समीर, माजी आमदार शिवराम झोले यांच्या स्नुषा हे निवडणूक रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत.

बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांचा मुलगा हर्षवर्धन यांना ‘लॉचींग' केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र आता त्यांना त्यांच्या जायखेडा गटातून उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

माजी उपाध्यक्ष संपत सकाळे, माजी सभापती पोपट अहिरे, अशोक सावंत, उषा बच्छाव, माजी सदस्य मनिषा भामरे, मनिषा बोडके, विलास आलबाड, दत्तू ढगे यांच्या पत्नी, दत्तात्रय पाटील, सुरेश ढोकळे, प्रवीण जाधव, ज्योती माळी, संभाजी पवार, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब वाघ आदींकडून निवडणुकीची तयारी होण्याची शक्यता अधिक आहे.

एवढेच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड हे उमेदवारीसाठी सिन्नरमधून आग्रही राहू शकतात, परंतु भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्यासाठी देवळ्यातून गट राहिलेला नाही.

त्याचवेळी माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या कन्या गीतांजली यांच्याकडून कळवणऐवजी बागलाण अथवा देवळ्याचा विचार होऊ शकेल. त्याचवेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे पती प्रवीण पवार यांच्यासाठी देवळ्यातून निवडणूक लढवण्याचा आग्रह होऊ शकतो.

पुन्हा संधी न राहिलेले सदस्य

रेखा पवार (ताहराबाद- काँग्रेस), कन्हू गायकवाड (नामपूर- भाजप), मीना मोरे (ठेंगोडा- भाजप), लताताई बच्छाव (ब्राह्मणगाव- भाजप), राजेंद्र सोनवणे (वडनेर-शिवसेना), दादाजी शेवाळे (झोडगे-शिवसेना), समाधान हिरे (रावळगाव-भाजप), संगीता निकम (दाभाडी-भाजप), जगन्नाथ हिरे (निमगाव-भाजप), धनश्री केदा आहेर (लोहणेर-भाजप), यशवंत शिरसाठ (उमराणे-राष्ट्रवादी), नूतन आहेर (वाखारी-राष्ट्रवादी), जयश्री पवार (खर्डेदिगर-राष्ट्रवादी), गीतांजली पवार (मानूर-राष्ट्रवादी), डॉ. कलावती चव्हाण (हट्टी-भाजप), अनिता बोडके (भवाडा-मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), रोहिणी गावित (अहिवंतवाडी-शिवसेना), छाया गोतरणे (कसबेवणी-शिवसेना), भास्कर भगरे (खेडगाव-राष्ट्रवादी), सारीका नेहरे (मोहाडी-शिवसेना), डॉ. सयाजीराव गायकवाड (दुगाव-राष्ट्रवादी), डॉ. आत्माराम कुंभार्डे

(तळेगाव रोही-भाजप), कविता धाकराव (वडाळीभोई-शिवसेना), शोभा कडाळे (वडनेरभैरव-काँग्रेस), रमेश बोरसे (साकोरे-शिवसेना), अश्‍विनी आहेर (न्यायडोंगरी-काँग्रेस), आशाबाई जगताप (भालूर-भाजप), सुनीता पठाडे (जातेगाव-शिवसेना), संजय बनकर (पाटोदा-राष्ट्रवादी), सविता पवार (नगरसूल-शिवसेना), महेंद्रकुमार काले (अंदरसूल-राष्ट्रवादी), कमल आहेर (मुखेड-शिवसेना), ज्योती वाघले (पिंपळगाव बसवंत-शिवसेना), ज्ञानेश्‍वर जगताप (लासलगाव-भाजप), किरण थोरे (विंचूर-राष्ट्रवादी), बाळासाहेब क्षीरसागर (उगाव-शिवसेना),

दीपक शिरसाठ (कसबे सुकेणे-शिवसेना), सिद्धार्थ वनारसे (चांदोरी-राष्ट्रवादी), सुरेश कमानकर (सायखेडा-राष्ट्रवादी), अमृता पवार (देवगाव-राष्ट्रवादी), अपर्णा खोसकर (गिरणारे-राष्ट्रवादी), यशवंत ढिकले (पळसे-राष्ट्रवादी), शंकरराव धनवटे (एकलहरे-शिवसेना), चारोस्कर (गोवर्धन-शिवसेना), रमेश बरफ (ठाणापाडा-मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), शकुंतला डगळे (अंजनेरी-काँग्रेस), उदय जाधव (घोटी-राष्ट्रवादी), कावजी ठाकरे (नांदगाव सदो-शिवसेना), हरिदास लोहकरे (खेड-शिवसेना), सुनीता सानप (नायगाव-शिवसेना), नीलेश केदार (नांदूरशिंगोटे-शिवसेना), शीतल सांगळे (चास-शिवसेना), वनीता शिंदे (ठाणगाव-शिवसेना).

ZP election Nashik news
काय चाललंय पक्षात? : BJPच्या भरवशावर MNSचा ‘राजतिलक’

न्यायालयीन लढाईची तयारी सुरु

आरक्षणाच्या मुद्यावरुन नाराज झालेल्या सर्वसाधारणप्रमाणे आरक्षित जागांसाठी इच्छुक असलेल्यांकडून न्यायालयीन लढाईची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तरुण नेतृत्वाचा समावेश आहे.

पंचायत समितीला एक आणि जिल्हा परिषद आरक्षणाला दुसरा न्याय असे काय? असा प्रश्‍न निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक असताना आरक्षणामुळे नाराज झालेल्यांमधून उपस्थित करण्यात येत होता. तरीही राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांमुळे आरक्षणाला होणारा विरोध कितपत ग्राह्य धरला जातो? हा खरा प्रश्‍न आहे.

ZP election Nashik news
आदित्य ठाकरेंचा वाहून गेलेला 'तो' पूल मुख्यमंत्री शिंदेंनी पुन्हा उभारला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com