Dr. Pravin Gedam
sakal
नाशिक: कोचरगाव (ता. दिंडोरी) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी माध्यान्न भोजनाची चव घेतली. विद्यार्थ्यांना पौष्टिक व दर्जेदार आहार मिळतो की नाही, याबाबत सविस्तर माहिती घेत त्यांनी संबंधितांना सूचना केल्या.