नाशिक: जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत जलजीवन मिशनच्या कामांशी संबंधित फाइल तब्बल २९ टेबलांवर फिरविली जात असल्याने ठेकेदार हैराण झाले आहेत. टेबलांची संख्या कमी करण्याची मागणी ठेकेदार संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्याकडे केली.