Nashik News : पाणीपुरवठाचे अभियंता भांडेकरांची बदली

Transfer
Transfer esakal

नाशिक : जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता (Executive Engineer) पी. सी. भांडेकर यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे येथे बदली झाली आहे. (ZP Rural Water Supply Department Executive Engineer Bhandekar transferred before completion of his tenure Nashik news)

विभागात जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रिया तसेच देण्यात आलेले प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश वादात सापडल्याने भांडेकर अडचणीत आले होते. त्यामुळे त्यांनी बदलीसाठी अर्ज केला असल्याने त्यांची बदली झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वतुर्ळात आहे.

त्यांच्या जागी अद्याप कोणालाही पदभार दिलेला नाही. दीड वर्षापूर्वी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी भांडेकर यांची सोलापूर येथून बदली झाली होती. त्यांच्या कार्यकाळात जलजीवन मिशन योजनेंतंर्गत १२८९ पाणीपुरवठा योजनांच्या निविदा प्रक्रिया राबविल्या गेल्या.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Transfer
Aditya Thackeray | खोके सरकारकडून पोकळ अश्‍वासनं : आदित्य ठाकरे

सुरूवातीस यात ठराविक ठेकेदारांनाच ही कामे दिल्याने भांड़ेकर यांच्यावर आरोप झाले होते. भांडकेर यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. भांडेकर यांचा पदभार, नेमका कोणाकडे दिला जातो याकडे आता लक्ष लागले आहे.

Transfer
Nashik News : 15 दिवसात 333 नळजोडणी खंडित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com