Nashik News : ZP कर्मचारी स्पर्धांची लगीनघाई अन् अध्यक्ष चषकाला मिळेना मुहूर्त! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ZP Nashik

Nashik News : ZP कर्मचारी स्पर्धांची लगीनघाई अन् अध्यक्ष चषकाला मिळेना मुहूर्त!

नाशिक : जिल्हा परिषदेत कर्मचारी क्रीडा स्पर्धांसाठी प्रशासनाची लगीनघाई सुरू असताना, ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषकच्या अंतिम सामन्यांसाठी मात्र, प्रशासनाकडून तारीख मिळत नसल्याची चर्चा आहे.

शिक्षण विभागाने तारीख मिळावी, यासाठी फाइल ठेवूनही तारीख मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद शाळांचे शिक्षकांनीच कर्मचारी स्पर्धेत भाग घेतलेला असल्याने, चषक स्पर्धा कधी घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. (ZP staff competitions start in hurry and president cup does not get time Nashik News)

ग्रामीण भागात केंद्रस्तरावर ८ ते १५ डिसेंबर ०२२ दरम्यान स्पर्धा झाल्या. १९ ते २४ डिसेंबर ०२२ दरम्यान बीटस्तरावर तर, २६ ते ३१ डिसेंबर ०२२ या कालावधीत गटस्तरावरील स्पर्धा पार पडल्या आहेत. या स्पर्धां झाल्यानंतर जिल्हास्तरावरील अंतिम स्पर्धेसाठी जिल्हा परिषद प्रशासन तारीख ठरवितात.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पदाधिकारी ही तारीख अंतिम करत असतात. परंतु, यंदा प्रशासक असल्याने मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडून ही तारीख अंतिम होणार आहे. परंतु, अद्याप ही तारीख निश्चित झालेली नाही. तारीख मिळावी यासाठी शिक्षण विभागाकडून फाइल प्रशासनाकडे गेली मात्र, त्यांना तारीख मिळालेली नाही.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

तारीख मिळत नसल्याकारणाने जिल्हास्तरावर अंतिम स्पर्धा होऊ शकलेल्या नाहीत. दुसरीकडे मात्र, कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांची तयारी जोरात सुरू आहे. त्यासाठी प्रशासन वेळकाढून बैठका घेतांना दिसत आहे. कर्मचारी वर्गाला स्पर्धांचा सराव करण्यासाठी वेळ दिला आहे. परंतु, ज्या स्पर्धांमधून भविष्यातील खेळाडू घडणार आहे.

त्या स्पर्धांना तारीख देण्यास प्रशासनाकडे वेळ नसल्याचे बघावयास मिळत आहे. कर्मचारी वर्गाच्या क्रीडा स्पर्धा असल्याने सर्व, यात गुंतलेले असल्याने या स्पर्धा लटकल्या असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे. यंदाच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना स्पेलिंग बी व बुद्धीबळ हे इनडोअर खेळ खेळण्यास परवानगी देण्यात आली आहे.

टॅग्स :NashiksportsZPZP Schools