Teacher Transfers
sakal
नाशिक: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील तीन हजार ८४८ शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झालेली असून, त्यांना कार्यमुक्तीचे वेध लागले आहेत. मात्र, संकलित मूल्यमापन चाचणी- १ झाल्याशिवाय शिक्षकांना कार्यमुक्त न करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी शुक्रवारी (ता. २६) निर्गमित केल्याने पात्र शिक्षकांचा हिरमोड झाला.