
नवापूर (जि. नंदुरबार) : तालुक्यात मंगळवारी पावसाने (Rain) विश्रांती घेतल्यानंतर बुधवारी (ता.१३) पुन्हा जोरदार हजेरी लावली. सायंकाळी पाच पासून शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाला (Heavy Rain) सुरवात झाली.
नवापूर तालुक्यात गेली चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. रंगावली पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
विसरवाडी परिसरातील डोंगराळ भागांमध्ये गेल्या तीन ते चार तासापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूराची परिस्थिती निर्माण झाली असून, तालुक्यातील सर्वच लघु मध्यमप्रकल्प ओसंडून वाहू लागले आहे. (Navapur rains intensified again Road closed on Surat Nagpur highway Nandurbar Latest Marathi News)
डोंगराळ भागात जोरदार पाऊस झाल्याने पुराचे पाणी पुन्हा रस्त्यावर आले आहे. सूरत-नागपूर महामार्गावरील रंगावली नदीचा रस्ता बंद करण्यात आला. म्हात्रे कंपनीने युद्धपातळीवर रस्ता सुरू करण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.
आज आमदार शिरीषकुमार नाईक यांनी भरपावसात, मुख्याधिकारी स्वप्नील मुदलवाडकर, उपनगराध्यक्ष अय्युब बलेसरिया, माजी नगरसेवक अजय पाटील यांच्यासह रंगावली नदी किनारी असलेल्या भगतवाडी परिसरातील भागाची पाहणी केली.
याप्रसंगी आमदार श्री. नाईक यांनी अतिवृष्टीमुळे नदीला महापूर येण्याची शक्यता असल्यामुळे रंगावली नदीकिनारालगत पूर रेषेच्या आत राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन केले आहे. दिवसभर आमदार श्री नाईक यांनी तालुक्याचा पूरग्रस्त भागाचा दौरा करून अधिकाऱ्यांना तत्काळ मदतीसाठी तत्पर रहा अशा सूचना दिल्या. तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, अभियंता संजय पाडवी उपस्थित होते.
विसरवाडीत पोलिस अधीक्षकांनी केली पाहणी
पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची मंगळवारी (ता.१२) पाहणी केली. शहरातील रंगावली नदी किनारी असलेल्या भागातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. विसरवाडी येथे ही भेट दिली.
तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसात नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित झाले आहे. तालुक्यातील एकूण ३५ घरे, तीन गोठ्यांची पडझड झाली आहे. शेतीचा देखील नुकसान झाले आहे.
पाऊस उघडल्यावर शेतीचे पंचनामे करण्यात येतील व शेतकऱ्यांना तसेच नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत दिली जाईल अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली. नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी नवापूर उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरची पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, तहसीलदार मंदार कुलकर्णी, मुख्यधिकारी स्वप्नील मुंडलवालकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत वसावे, डॉ. प्रमोद कटारिया, डॉ. अमोल वळवी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.