धुळे- घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासाठी धुळे महापालिकेकडून प्रतिघर ५० ते १०० रुपये कर घेणार आहे. कचरा संकलन कराचा हा आदेश रद्द करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महापालिका आयुक्तांकडे केली..महाराष्ट्रातील युती सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये लोकांची दिशाभूल करून मते मिळवली आणि आता सत्तेत आल्यावर आपले खरे रंग दाखवू लागले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने धुळे महानगरपालिकेला आदेश देऊन प्रत्येक घरातून कचरा जमा करण्याच्या नावाखाली शुल्क घेण्याचे जाहीर करून तसा आदेश दिला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने म्हटले आहे. .कर आकारणी अशीप्रत्येक घर मालकाकडून दरमहा ५० ते १०० रुपये वेगळा कर महापालिका घेणार आहे. अर्थात दरवर्षी ६०० ते १२०० रुपये वेगळे पैसे मालमत्ता करामध्ये भरावे लागणार आहेत. तसेच दुकानदार, व्यापारी, व्यावसायिक, कार्यालये, फेरीवाले यांच्याकडून १२० ते १५०० रुपयापर्यंत हा कर आकारला जाणार आहे. .ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे. मंदिर, धार्मिक संस्थांना दरमहा ९० रुपये कचरा संकलन कर आकारण्याचे आदेश दिले आहेत, यावरून त्यांचा ढोंगीपणा लक्षात येतो. वास्तविक मालमत्ता करामध्ये दरवर्षी विशेष स्वच्छता कर, मलनिस्सारण कर, मलप्रवाह कर आदी विविध नावाने स्वच्छता कर धुळेकर नागरिक भरत आहेत. त्यानंतर आता कचरा संकलनाच्या नावाखाली दरमहा नागरिकांना पैसे द्यावे लागणार आहेत. हा एक प्रकारे सुल्तानी कर असल्याचे पक्षाने म्हटले आहे..अधिकारी, ठेकेदार मालामालघंटागाडी नियमित येत नाही, १५ ते २० दिवसांनंतर घंटागाडी येते, शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत, अशी दुरवस्था असताना धुळे महापालिकेकडून नवीन कर आकारणे चुकीचे आहे..कोट्यवधी रुपयांचा कचऱ्याचा ठेका देऊन अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार मालामाल झाले आहेत, असा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला. या प्रकाराचा निषेध असून, कचरा संकलन कराचा आदेश त्वरित रद्द करावा; अन्यथा याविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशाराही पक्षाने दिला. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, नंदू येलमामे, जोसेफ मलबारी, राजेंद्र सोलंकी, यशवंत पाटील, राजेंद्र डोमाळे, भिका नेरकर, राजू मशाल, युसूफ शेख, समद शेख, रामेश्वर साबरे, उजेर शेख, अमीन शेख, कल्पेश मगर, मंगलदास वाघ, सोनू घारू, सुनील अहिरराव आदींनी मागणीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांना दिले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.