जळगाव- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावर आले असताना, कार्यक्रमात उशीर होऊन ते विमानतळावर पोहोचले. मात्र, ‘एटीसी’ची परवानगी नसल्याने पायलटने उड्डाण भरल्यास नकार दिला. तब्बल एक तास उशिराने विमान उड्डाणाला परवानगी मिळाली. मात्र, उपमुख्यमंत्र्यांचा हा विलंब जामनेर तालुक्यातील एका महिलेच्या जीवनासाठी उपयोगी आला.