Cotton
sakal
निमगूळ: निमगूळसह परिसरात अतिवृष्टीने कापसाच्या पिकांसह बाजरी, मका, मिरची अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापसाला प्रतिक्विंटल पाच ते सहा हजारांचा भाव मिळत असून, वेचणीला आठ हजार प्रतिक्विंटल खर्च लागत आहे. फवारणी, खते व मेहनत वाया जात असल्याचे चित्र आहे. हीच स्थिती तालुक्याची असून, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी वर्गाचे दिवाळे निघाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.