Dhule Crime News : 6 लाखांच्या गांजासह एकाला अटक

Assistant Inspector Jayesh Khalane, Sub-Inspector Krishna Patil and colleagues while confiscating ganja plants.
Assistant Inspector Jayesh Khalane, Sub-Inspector Krishna Patil and colleagues while confiscating ganja plants.esakal

Dhule Crime News : टिटवापाणी (सुळे, ता. शिरपूर) येथील गांजाच्या शेतावर सोमवारी (ता. १६) छापा टाकून सांगवी पोलिसांनी पावणेसहा लाख रुपये किमतीचा १६५ किलो गांजा जप्त केला.

गांजाची लागवड केल्याच्या संशयावरून एकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.(One arrested with marijuana worth 6 lakhs dhule crime news)

सांगवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे यांना सुळे गावाजवळ टिटवापाणी पाड्यावरील शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक कृष्णा पाटील व सहकाऱ्यांसह १६ ऑक्टोबरला दुपारी तेथे छापा टाकला.

संशयित शेतमालक मदन भरतसिंह पावरा (वय ४८, रा .टिटवापाणी) याने पोलिसांना पाहून पळ काढला. पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पोलिसपाटलाकरवी शेती मदन पावरा याची असल्याची खात्री पटविल्यानंतर पोलिसांनी शेताची पाहणी केली.

Assistant Inspector Jayesh Khalane, Sub-Inspector Krishna Patil and colleagues while confiscating ganja plants.
Dhule News : सव्वाशे वृद्धांना दिवाळी किराणा किट, गरम कपडे; फर्स्टक्राय संस्थेचा उपक्रम

पाच ते सहा फूट उंचीची गांजाची झाडे पोलिसांनी उपटून काढली. या कारवाईत एक क्विंटल ६५ किलो गांजा जप्त करण्यात आला असून, त्यांची किंमत पाच लाख ७७ हजार ५०० रुपये आहे. संशयिताला अटक करण्यात आली.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे, उपनिरीक्षक कृष्णा पाटील, सुनील वसावे, हवालदार संजय माळी, पोलिस नाईक शेखर बागूल, प्रकाश भिल, सुनील पवार, अल्ताफ मिर्झा, इसरार फारुकी यांनी ही कारवाई केली. उपनिरीक्षक संदीप पाटील तपास करीत आहेत.

Assistant Inspector Jayesh Khalane, Sub-Inspector Krishna Patil and colleagues while confiscating ganja plants.
Dhule News : कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी उपाययोजना; दक्षता घेण्याचे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com