Dhule Accident News : अंगावरुन कार गेल्याने एका वर्षाची चिमुकली ठार

accident
accidentesakal

Dhule Accident News : रस्त्याच्याकडेला झोपत असलेल्या लोकांच्या अंगावरुन कार गेल्याने एक वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला.

याप्रकरणी कारचालकाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवी सोलंकी असे मृत मुलीचे नाव आहे.(one year old child was dead in car accident dhule news)

शनिवारी (ता.१६) रात्री नंदुरबार धुळे रस्त्याला डाबरी घरकुलकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बाजूला मोकळ्या जागेवर रमेश हिरामण पवार (रा. पाचोरा) हे परिवार व नातेवाईका समवेत एकत्र राहतात. लोहारी काम करण्यासाठी ते गावोगावी जाऊन उदरनिर्वाह करतात.

रात्री लोहारी कामकाज सर्व कुटुंबिय पडाव टाकून झोपले होते. गंगाबाई सोमनाथ सोलंकी त्यांची वैष्णवी सोलंकी या दोघी झोपलेल्या असताना भरधाव जात असलेली चारचाकी त्यांच्या अंगावरुन गेल्याने दोघी गंभीर जखमी झाल्या.

accident
Dhule Accident News : दोंडाईचा येथे अपघातात मोटारसायकलस्वार ठार

यावेळी स्थानिकांनी तत्काळ दोघींनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैष्णवी हिस तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी रूपेश हिरामण पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कारचालक (एमएच १५ इइ ०४२८) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

accident
Dhule Accident News : वाहतुकीची वाट अरुंद; मातीच्या ढिगाऱ्यांनी घेतला चालकाचा बळी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com