गोडा येथे कांदाचाळ आगीत भक्ष्यस्थानी ; तीन लाखांचे नुकसान 

महेश भामरे
रविवार, 17 जून 2018

ठेंगोडा (नाशिक) : येथील सुतगिरणी रस्त्यालगत असलेल्या शेतातील कांदाचाळीस काल शनिवार (ता.१६) रोजी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागुन साठवलेला कांदा जळून भस्मसात झाल्याने शेतकऱ्याचे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडुन त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

सध्या कांद्याचे बाजारभाव म्हणजे झालेला खर्चपण वसुल होत नाही असे असुन शेतकरी बांधवाना कांदा साठवणुक करण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही म्हणुन येथील शेतकरी रमेश बापु सोनवणे यांनी त्यांच्या मालकीच्या शेतात उत्पादन काढलेला जवळपास दहा ट्रॅक्ट्रर ट्राली कांदा त्यांचे ०.२३ आर क्षेञात  ७६१ -१ -१ येथे साठवणुक करून ठेवला होता. काल राञी ९.३०  वाजता अचानक कांदाचाळीला लागलेल्या आगीमुळे सुमारे तीनशे क्विंटल कांदा जळुन खाक झाला आहे. यामुळे आजच्या बाजारभावाप्रमाणे तीन लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. याबाबत कुणावरही संशय नसुन या आगीचे कारण अद्याप समजु शकले नसल्याचे तलाठी व्हिएम शिरसाठ, कृषीसेवक पुष्पा गायकवाड यांनी पंचनाम्यात नमूद केले आहे.

मेश सोनवणे हे अल्पभुधारक शेतकरी असुन शासनाकडुन झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी सोनवणे, गोरख सोनवणे , भिका वाघ,मोतीराम चौधरी,भिलासिंग परदेशी , कैलास पगार,वसंत शिंदे,मधुकर व्यवहारे,प्रदिप शेवाळे यांनी केली आहे 

कांद्याला बाजारभाव नसल्याने कांदासाठवुण ठेवलेला होता.अचानक आग लागून सर्व कांदा जळुन खाक झाला असुन शासनाने नुकसान भरपाई द्यावी
- रमेश सोनवणे - नुकसानग्रस्त शेतकरी
         
Web Title: Onion Godown got fire at Goda; three lakhs loss