नवरात्रीनिमित्त ऑनलाईन खरेदी जोरात..

किशोरी वाघ : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

नाशिक :  नवरात्रोत्सवासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. विविध वस्तूंनी बाजारपेठा सजू लागल्या आहे. मात्र या सोबतच ऑनलाईन खरेदीकडेही अनेकांचा कल वाढला आहे. विविध ऍपवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स सुरु असल्याने अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

नाशिक : शहरात एक दिवसावरआलेल्या नवरात्रोत्सवासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. नाविन्यपूर्ण कपडे, अलंकार, पुजा साहित्य यामुळे बाजारपेठा सजू लागल्या आहे. बाजारपेठांबरोबर ऑनलाईन खरेदीकडेही अनेकांचा कल वाढला आहे. विविध इ कॉमर्स ऍपवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स सुरु असल्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतांना दिसत आहे. आकर्षक सूट आणि इतर विविध फायद्यांमुळे महिलांसह पुरुषही मोठ्या प्रमाणात खरेदी करतांना दिसून येत आहेत. 

घागरा चोली, दांडिया व ऍक्‍सेसरीजची भुरळ
नवरात्रोत्सवात रंगबिरंगी कपडे, दांडिया, ऍक्‍सेसरीज, सौदर्य प्रसादने, देवीच्या मुर्ती, देवीचे विविध आभूषणे अशा अनेक वस्तु ई कॉमर्स ऍपवर सहज उपलब्ध असल्यामुळे त्यांना चांगलीच पसंती मिळत आहे. त्याचप्रमाणे, घागरा चोलीच्या वैविध्यपूर्ण डिझाइन्स व किंमतीत सूट याकडे तरुणाईचे खास आकर्षण दिसून येते आहे. देवीची मुर्ती देखील ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे बाजारपेठांत जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीला पसंती आहे. 

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी घसघशीत सवलती
स्त्रियासाठी खास ज्वेलरी, दांडिया यात वैविध्य असल्यामुळे तरुणांना त्याची भुरळ पडत आहे. नवरात्रीच्या मुहुर्तावर घसघशीत सवलतीमुळे ग्राहक आकर्षित होतील, अशी कंपन्यांची अपेक्षा आहे. ज्या ग्राहकांना घराबाहेर जाऊन खरेदी करणे जमत नाही अशा वेळी एक क्‍लिकवर उपलब्ध असलेले ऑनलाईन दुकानातून खरेदी केली जाते आहे. आता बदलत्या काळानुसार, मॉलमध्ये देखील जाण्याची गरज राहिलेली नाही. त्याउलट ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांनी घरबसल्या खरेदीची सुविधा दिलीच शिवाय दुकांनाप्रमाणे कोणताच खर्च होत नसल्यामुळे वस्तूंवर घसघशीत सवलत देणे त्यांना शक्‍य झाले आहे. त्यामुळे खरेदीचा हा पर्याय ग्राहकांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे. 

प्रतिक्रिया
ऑनलाईन पेमेंट करतांना योग्य रक्कम तपासून घ्यावी. फेक स्किमपासून सावध रहावे. सामाजिक माध्यमांवर आलेल्या लिंकवर जाऊन खरेदी करु नये - ओंकार गंधे, सायबर सुरक्षा विश्‍लेषक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Shopping craze for Navratri festival