धुळे- असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांसाठी ई-श्रम कार्ड योजना सुरू आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सुरू केलेल्या ई-श्रम पोर्टलवर दहा मार्चपर्यंत खानदेशातील सुमारे १५ लाख ६७ हजार १९४ असंघटित कामगार, मजुरांनी नोंदणी केली आहे. यात धुळे जिल्ह्यात तीन लाख ८६ हजार ७६९, तर नंदुरबार जिल्ह्यातील दोन लाख ९० हजार ३३३, अशा एकूण सहा लाख ७७ हजार १०२ कामगारांचा समावेश आहे. यातील सर्वाधिक असंघटित कामगार, मजूर हे कृषी क्षेत्राशी निगडित आहेत.