Government Schemes: पाचोरा-भडगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात; ५ हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ

शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छत्राखाली; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील ५ हजार लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, अनुदाने, कर्ज व घरकुल वाटप करून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात पार
Citizens received certificates, financial assistance, agricultural subsidies and information about various Maharashtra government welfare schemes.

Citizens received certificates, financial assistance, agricultural subsidies and information about various Maharashtra government welfare schemes.

Sakal

Updated on

नांद्रा (ता.पाचोरा) : पाचोरा-भडगांव विधानसभा मतदार संघासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचा जन्म दिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधुन शासन आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरचा कार्यक्रम दिनांक ३०/०७/२०२६ रोजी सकाळी ११:०० ते सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत मा.आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्या प्रमुख उपस्थित महाराष्ट्र कृषी विकास महामंडळ गिरड रोड पाचोरा येथे उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शासनाच्या योजनांचा लाभ हा सर्व सामान्य नागरीक, शेतकरी, वयोवृद्ध, विद्यार्थी, विविध योजनांचे पात्र लाभार्थी यांना त्याच दिवशी गिळून देणे तसेच विविध योजनांची माहिती देणे होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com