Nagar Panchayat
sakal
पाचोरा: येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदी आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील विजयी झाल्या आहेत. सुनीता पाटील व माजी आमदार यांच्या पत्नी सुचेता वाघ यांच्यात सरळ लढत झाली. सुनीता पाटील यांना २५ हजार ८६५, तर सुचेता वाघ यांना १४ हजार ५१७ मते मिळाली. त्यात ११ हजार ३४८ मताधिक्याने सुनीता पाटील विजयी झाल्या. सुनीता पाटील दुसऱ्यांदा नगराध्यक्षा झाल्या.