पंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'

अमोल खरे
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

मनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. नुकतीच त्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. विस्टाडोम कोच पारदर्शक असल्याने ईगतपुरी कसारा घाटा दरम्यान निसर्ग सौंदर्य अनुभवणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ मिळणार आहे. 

मनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. नुकतीच त्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. विस्टाडोम कोच पारदर्शक असल्याने ईगतपुरी कसारा घाटा दरम्यान निसर्ग सौंदर्य अनुभवणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ मिळणार आहे. 

पारदर्शी विंडो सिस्टम असलेल्या 'विस्टाडोम कोच'या रेल्वेमधून प्रवाशांना निसर्गसौंदर्याची अनुभूती घेता येणार आहे. मनमाड मुंबई प्रवाशांच्या सेवेत असा कोच लवकरच रूजू होणार असून, मनमाड येथून सुटणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसला एक विस्टाडोम (ग्लास-टॉप) कोच लावण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये अशा पद्धतीची पहिलीच रेल्वे कोकण मार्गावरील निसर्गाचा आनंद प्रवाशांना घेता येण्यासाठी मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसला सुरवात करण्यात आली होती. विशाखापट्टणम येथेही विस्टाडोम कोच लावण्यात आले असून, त्यापाठोपाठ मध्य रेल्वेने शंभर पेक्षा जास्त गाड्या आहे ज्या निसर्ग सौंदर्य असलेल्या पतीसरातून जातात त्यांना आता विस्टाडोम कोच प्रकारचा पारदर्शक डबा लावण्यात येणार आहे. देशभरातील या शंभर गाड्यांमध्ये पंचवटी एक्सप्रेसचा समावेश करण्यात आला.  नुकतीच रेल्वे बोर्डाने त्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच प्रवाशांना ही सेवा उपलब्ध करून देणार आहे. या कोचचे वैशिष्ट्य असे की या विशेष डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोटेबल आसनाचा आनंद घेता येणार आहे. तसेच हॅंगींग एलईडी पाहात मनोरंजनही करता येणार आहे. सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असा हा विस्टाडोम कोच आहे. पारदर्शी छत, मोठ्या आकाराच्या काचेच्या खिडक्या, फिरणा-या खुर्च्या, स्वयंचलित दरवाजे इतरही अनेक वैशिष्ट्यं आहेत. प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारी `विस्टाडोम कोच` मनमाड मुंबई दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस ला जोडण्यात येणार असून, हा कोच प्रवाशांच्या सेवेत लवकरच रुजू होणार आहे. विस्टाडोम कोचची निर्मिती चेन्नईतील द इंटीग्रल कोच फॅक्ट्रीत करण्यात आली आहे. नुकतेच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या ऑफिसीअल ट्विट वरून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला हा कोच मध्य रेल्वे लवकरच मागवणार आहे.  

पंचवटी एक्सप्रेस
१ नोव्हेंबर १९७५ रोजी चालू करण्यात आलेली पंचवटी एक्सप्रेस ही गाडी मध्य रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक मानली जाते मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक रोड, देवळाली, इगतपुरी, कसारा, कल्याण, दादर, मुंबई सीएसटी असा २५८ किमीचा प्रवास करते.  

निसर्गसौंदर्याचा अनुभव 
सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेल्या निसर्गसंपन्न इगतपुरी कसाऱ्याच्या पर्वतरांगामधील घाटातून रेल्वे लाईन गेली आहे या घाटात रेल्वेचे सहा बोगदे व दोन डोंगराला जोडणारे रेल्वे पूल आहे महाराष्ट्राच्या इतर ठिकाणच्या तुलनेत या ठिकाणी सर्वाधिक पाऊस होते त्यामुळे  महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून हे स्थळ ओळखले जाते पावसाळ्यात येथील उंच अश्या पर्वतरांगा मधून पांढरे शुभ्र पाण्याचे तुषार उडवत कोसळणारे धबधबे, हिरवागार निसर्ग, धुक्याची दुलई, आल्हाददायक हवा, निर्मळ परिसर, निसर्गराजाने नेत्रात साठवता येणार नाही एवढी भरभरून दिलेली वनराई, मंद मंद करणारा पाऊस, क्षणात पालटणारे धुकेमय वातावरण, घनदाट वृक्षांची छाया, खोल खोल दऱ्या, किलबिल करणारे पक्षांचे थवे, रान फुलांचा मंद मंद सुगंध हिरवेगार निसर्गरम्य वातावरणात रेल्वे गाडीतून जातांना प्रवाशांना आकर्षित करून  घेतात थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध असल्याने कोणत्याही मोसमात इथला निसर्ग अनुभव रेल्वेने प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला आपल्या मोहात पाडतो हा निसर्ग डोळे भरून अनुभवता यावा यासाठी रेल्वेने विस्टाडोम कोच पंचवटी एक्सप्रेसला लावण्याचा निर्णय घेतला आहे 

रेल्वे बोर्डाद्वारे वीस्टाडोम बोगी मनमाड़ मुंबई पंचवटी एक्सप्रेस ला लावली जाणार आहे त्यामुळे प्रवाशांना निसर्गसौंदर्याचा आनंद प्रवास करताना घेता येणार आहे रेल्वेने प्रवाशांच्या सेवा, सुविधा, सुरक्षा व्यतिरिक्त त्यांच्या प्रवास आनंददायी व सुखकर व्हावा यासाठी घेतलेला निर्णय हा सकारात्मक आहे
- नितिन पांडे, मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय (झोनल ) समिति सदस्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panchavati Express will soon be 'vista coach'