जळगाव - पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी मध्य रेल्वे व एसटी महामंडळाने यंदा विशेष नियोजन केले आहे. त्यामुळे यंदाची आषाढी वारी आरामदायक होणार आहे. मध्य रेल्वेकडून यंदा १ ते १० जुलैदरम्यान पंढरपूर आणि मिरजसाठी ८० आषाढी विशेष गाड्या धावणार आहेत. तर एसटी महामंडळातर्फे जिल्ह्यातील ११ बस आगारातून प्रत्येकी एक बस पंढरपूरला जाण्यासाठी सकाळी आठला सोडण्यात येत आहे. आतापर्यंत २५ एसटी महामंडळाच्या बस आरक्षित (बुकिंग) झाल्या आहेत.