बिबट्या मोकाट; वन कर्मचाऱ्यांत शुकशुकाट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

लामकानी: बोरीसह परिसरात तब्बल चार-पाच महिन्यांपीसून बिबट्याची एकच दहशत पसरली असून, बिबट्याने शेतशिवारातील, वाड्या-वस्त्यांवर पाळीव जनावरे आणि भटक्या कुत्र्यांना लक्ष बनवून फडशै पाडण्याची जणू मोहीमच आखली आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा, याबाबत अनेकदा लेखी अर्ज-फाटे करुनही वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. यात बिबट्या मोकाट आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये शुकशुकाट, तसेच संतप्त चित्र दिसून येत आहे. या बिबट्याला त्वरित बंदोबस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.
 
बोरीसह परिसरातील रामी, बोरसुले, वडणे, देशमुखवाडी, जगन्नाथबाबा परिसरात चार-पाच महिन्यांपासून बिबट्याने ग्रामस्थांमध्ये दहशत माजवली आहे. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत बिबट्याने आतापर्यंत गायी वासरू, शेळ्या, मेंढ्या अशा अनेक पाळीव जनावरांसह भट्कया कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. बिबट्याच्या या दहशतीमुळे आता भटकी कुत्रीही दिसेनाशी झाली आहेत. 

उस कापताना अचानक ते आले समोर अन् मजुर भीतीने घामाघूम

अनेकदा शेतांमध्ये काम करताना शेतकरी मजुरांना बिबट्याचे दर्शन घडल्याने दहशतीचे वातावरण आहे. अनेक शेतमजूर शेतात काम करण्यास नकार देत आहेत. यातच विज कंपनीतर्फे ग्रामीण भागात रात्रीच्या वेळीच विजपुरवठा होत असल्याने रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे सावट आहे. बिबट्याच्या या दहशतीला वन विभागाचा जणू खुला पाठिंबा असल्याचे व तक्रारी करूनही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हाताची घडी तोंडावर बोट, असेच धोरण स्वीकारल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गावागावात रात्रीचा पहारा 

बोरीस गावात बिबट्याची दहशत इतकी वाढली आहे, की रात्रीच्या वेळी ग्रामस्थ हातात लाठ्या-काठ्या घेऊन पहारा देत आहेत. धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याची लेखी मागणी बोरीस ग्रामपंचायतीने वन विभागाकडे केला; परंतु वन विभागाने विज कंपनीला दिवसा वीजपुरवठा करण्याचे लेखी पत्र देण्यापलीकडे काहीच कार्यवाही केली नाही. बिबट्याच्या भीतीने रामी फाट्यावरील गणेश टेक्सटाईल्समध्ये रात्रपाळीत काम करणाऱ्यांच्या संख्येतही घट झाल्याने रोजगारावरही परिणाम झाला आहे.

'सिव्हिल'मधील स्टोररूम फोडले

वन विभागाबाबत तीव्र संताप 

बिबट्याच्या या दहशतीमुळे एकीकडे चिंतेचे वातावरण असताना वन विभागाकडून काहीच कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आतापर्यंत पाळीव, मोकाट जनावरांचा बळी घेणाऱ्या बिबट्याने एखादा मानवी बळी घेतल्यावर वन विभाग कार्यवाही करणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. बिबट्याला लवकरात  लवकर जेरबंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांकडून दिला जात आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panic due to appearance of leopard in Dhule