पानटपरीवाला बनला एका शिक्षण संस्थेचा अध्यक्ष!

प्रा. भगवान जगदाळे
रविवार, 23 डिसेंबर 2018

माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील एक सामान्य पानटपरी चालक एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्याने गावासह परिसरातील सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केले आहे. निजामपूर-जैताणे नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी नुकतीच पठाण शब्बीरखान अमीरखान यांची निवड झाली. मावळते अध्यक्ष शेख उस्मान शेख चांद यांनी नुकताच त्यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविला.

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील एक सामान्य पानटपरी चालक एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्याने गावासह परिसरातील सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केले आहे. निजामपूर-जैताणे नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी नुकतीच पठाण शब्बीरखान अमीरखान यांची निवड झाली. मावळते अध्यक्ष शेख उस्मान शेख चांद यांनी नुकताच त्यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविला.

नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणीत फेरबदल करण्यात येऊन नुकतीच नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. संचालक मंडळात पानटपरी चालकासह गॅरेज मेकॅनिक, हॉटेल व्यावसायिक, ट्रकचालक, घड्याळ दुकानदार आदी छोटया-मोठया व्यापारी व व्यावसायिकांचा समावेश आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सर्वसामान्य अकरा संचालकांनी 22 ऑगस्ट 1990ला नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित अँग्लो उर्दू स्कुलची स्थापना करून मुस्लिम समाजातील मुलामुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले.

संस्थेचे मावळते अध्यक्ष शेख उस्मान शेख चांद यांनी राजीनामा देत एक सामान्य पानटपरीचालक पठाण शब्बीरखान आमीरखान या संचालकाकडे संस्थेची धुरा सोपवली. सन 2018 ते 2021 यासाठीची नूतन कार्यकारिणी याप्रमाणे :
अध्यक्ष : शब्बीरखान पठाण
उपाध्यक्ष : शहाबुद्दीन शेख
सचिव : लियाकत अली सय्यद
खजिनदार : अब्दुल्लाह खान पठाण
अन्य संचालक : उस्मान शेख, साबीर शेख, कौसरअली सय्यद, रिजवान शेख, जब्बार अली सय्यद, मियाबेग मिर्झा, सलीमखान पठाण आदींचा त्यात समावेश आहे.

शाळेत नुकत्याच घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संचालक मंडळातर्फे ही माहिती देण्यात आली. यावेळी रघुवीर खारकर, बापू बदामे, खुदाबक्ष शेख यांच्यासह संचालक मंडळ व शाळेचे मुख्याध्यापक नासिरखान, वरिष्ठ लिपिक साबीर शेख आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उस्मान शेख, लियाकतअली सय्यद, बापू बदामे, साबीर शेख आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. "आगामी काळात आपण संस्थेच्या विकासासाठी कटिबद्ध राहू" अशी प्रतिक्रिया शब्बीरखान पठाण यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PanShop Owner becomes the president of a educational institute