Dhule News : जीवनवाहिनी की सांडपाण्याचं केंद्र? धुळ्याच्या पांझरा नदीला प्रशासकीय अनास्थेचा विळखा

The Lost Glory of Panzara River : एकेकाळची वैभवशाली जीवनवाहिनी आज प्रशासकीय अनास्था आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे अस्वच्छतेच्या विळख्यात आहे. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या पांझरेसोबत सेल्फी काढणारी गर्दी इतर वेळी मात्र तिच्या दुरवस्थेकडे पाहून हळहळते.
Panzara River in Dhule

Panzara River in Dhule

sakal 

Updated on

शहराच्या मध्य भागातून नदी वाहणे हे निसर्गाचे लेणे मानले जाते, मात्र धुळेकरांसाठी हे ‘पांझरा भाग्य’ केवळ राजकीय, प्रशासकीय भाषणांपुरतेच मर्यादित दिसते. एकेकाळची वैभवशाली जीवनवाहिनी आज प्रशासकीय अनास्था आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे अस्वच्छतेच्या विळख्यात आहे. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या पांझरेसोबत सेल्फी काढणारी गर्दी इतर वेळी मात्र तिच्या दुरवस्थेकडे पाहून हळहळते. पांझरामाईचे, धुळेकरांचे हे दुःखमयी पडसाद लोकप्रतिनिधींच्या कानी पडणार की पुढील चार वर्षांत पुन्हा आश्‍वासनांच्या पुरातच वाहून जाणार?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com