Rate Hike : पपईला 17 रुपये प्रतिकिलो दर; शेतकऱ्यांमध्ये समाधान

The prices of papaya crop increase
The prices of papaya crop increaseesakal

शहादा (जि. नंदुरबार) : यंदा पपई पिकाला फळधारणा कमी आहे. त्यामानाने खर्च जास्त झाल्याने उत्पादित मालाला अपेक्षित भाव मिळावा ही पपई उत्पादक शेतकऱ्यांची मागणी होती. (Papaya rate hike price of Rs 17 per kg farmers are satisfied nandurbar news)

त्यानुसार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नंदुरबार जिल्हा फळबागातदार संघटनेच्या पुढाकाराने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पपई उत्पादक शेतकरी व खरेदीदार व्यापारी यांची सयुक्तिक बैठक झाली.

तीत प्रदीर्घ चर्चेनंतर १७ रुपये प्रतिकिलो दर सर्वानुमते ठरविण्यात आला. दरम्यान, यंदाच्या हंगामात सर्वाधिक उच्चांकी दर मिळाल्याने पपई उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पपईचे उत्पादन घेतले जाते. येथील पपई खरेदीसाठी उत्तर प्रदेशातील व्यापारी मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. दररोज शेकडो गाड्यांची ये-जा सुरू असते. शेतकरी व व्यापारी दोघांचे हीच साधत नंदुरबार जिल्हा केळी-पपई फळबागायतदार संस्थेतर्फे बाजारपेठेचा अंदाज घेऊन दरवाढीसंदर्भात नियमित बैठक घेण्यात येते.

त्यानुसार पाच दिवसांपूर्वी बैठक घेण्यात आली होती. तीत सर्वानुमते १२ रुपये ८० पैसे दर ठरविण्यात आला होता; परंतु बाजारपेठेच्या अंदाज घेत व सध्याची परिस्थिती लक्षात घेता इतर ठिकाणी दर वाढल्याचे लक्षात येताच पुन्हा केळी-पपई फळ उत्पादक संघटनेने शेतकरी व व्यापाऱ्यांची सयुक्तिक बैठक घेतली. तीत तब्बल चार रुपये २० पैशांनी दर वाढवत सर्वानुमते १७ रुपये दर ठरविण्यात आला.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

The prices of papaya crop increase
Co-operative Societies Elections : मार्चपासून सहकारी संस्थांची रणधुमाळी; निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश

शेतकऱ्यांनी मानले आभार

सध्या वातावरणात होणारे बदल नैसर्गिक संकट शेतकऱ्यांना अडचणीत टाकणारे आहे. शेती उत्पन्नावर परिणाम झाल्याने शिवाय शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत होता. पपई पिकाला मिळणारा भावदेखील खर्चाच्या मानाने कमी होता. पपई, केळी उत्पादक संस्थेने सध्याची परिस्थिती बघता शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे.

पपई पिकाला दिला जाणारा भाव खर्चाच्या मानाने परवडत नसल्याचे हेरले त्यासोबतच शेतकऱ्यांनी दरवाढीची मागणी केलेली होती. त्याच आधारावर पुन्हा बैठक घेऊन ऐतिहासिक दरवाढ केली. बैठकीत समन्वय साधून शांततेच्या मार्गाने सर्वानुमते १७ रुपये दर ठरविण्यात आला.

दरम्यान, सुरवातीपासूनच संस्थेने शेतकरीहित साधत समन्वय घडवून आणल्याने शेतकऱ्यांनी या वेळी पपई, केळी उत्पादक संस्थेचे आभार मानत अभिनंदन केले. बैठकीला नंदुरबार जिल्हा फळबागायतदार शेतकरी संस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांसह निझर, तळोदा, शहादा आदी भागासह जिल्हाभरातून शेतकरी उपस्थित होते.

"शेतकरी व व्यापाऱ्यांनी समन्वय साधून १७ रुपये हा दर ठरविला. भविष्यात व्यापारी व शेतकऱ्यांनी असाच समन्वयाने दर साधल्यास यात सर्वांचा आर्थिक फायदा होईल. बैठकीत व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत संस्थेने दोघांमध्ये योग्य तो समन्वय घडून आणला."

-अभिजित पाटील,अध्यक्ष, नंदुरबार जिल्हा पपई, केळी फळबागायतदार संघटना

The prices of papaya crop increase
Weather Effects : वातावरणामुळे दुभत्या जनावरांच्या क्षमतेवर परिणाम! 10 लिटर मागे सरासरी 2 लिटरची घट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com