Dhule Agriculture News : नैसर्गिक शेतीतून 6 लाखांचे निव्वळ उत्पन्न; प्रगतिशील शेतकऱ्याचा विषमुक्त शेतीवर भर

Budgujar's cotton field.
Budgujar's cotton field. esakal

Dhule Agriculture News : कुठलीही फवारणी व रासायनिक खतांचा वापर न करता दहा एकर बागायती क्षेत्रातून सर्व खर्च वजा जाता सुमारे सहा लाखांचे निव्वळ उत्पन्न घेतले.

येथील प्रगतिशील शेतकरी राजेंद्र धुडकू बडगुजर १६ वर्षांपासून नैसर्गिक शेती करत आहेत. त्यांच्याकडे दहा एकर शेती आहे. कोणती फवारणी व रासायनिक खतांचा वापर ते करत नाहीत.

ते संपूर्ण शेती नैसर्गिक खत, शेणखत व मशागतीच्या जोरावर करतात. सुरवातीची दोन वर्षे उत्पन्न कमी आले; परंतु ते खचले नाहीत. (Rajendra Badgujar do Toxic Free Farming dhule agriculture news)

कापूस, बाजरी, ज्वारी, गहू अशी पिके ते घेतात. एका एकरला आठ ते नऊ क्विंटल कपाशीचे उत्पन्न त्यांना येते. अनेक वेळा आपल्या शेतात कोळपणी करून कोळपणीवर सर्वांत जास्त भर देतो, असे त्यांचे म्हणणे आहे. कोळपणी करून जमीन मोकळी होऊन पिकांना पोषक हवा मिळते. मशागत करून १०० टक्के शेतीला फायदा होतो, असा त्यांचा दावा आहे ते ‘ॲग्रोवन’ दैनिक नियमित वाचतात.

त्यांचे म्हणणे आहे, की ॲग्रोवनमधील शेतीउपयुक्त माहिती वाचून शेती करायला प्रोत्साहन मिळते. त्यांचा निसर्गावर पूर्ण भरवसा आहे. पिकांच्या पानावर ते ट्रायको कार्ड चिपकवतात किंवा पानाला पंचिंग करतात. त्यात अळी खाणारे किडे तयार होतात. एका हेक्टरमध्ये ते दहा ट्रायको कार्ड लावतात.

त्याच्याने पिकांवरील अळ्या नष्ट होतात. रसायनयुक्त फवारणी न केल्यामुळे पक्षी शेतात येतात व अळ्या खातात. त्यामुळे रोगराई पडत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. एका एकरमध्ये दहा डांबर गोळ्या ते टाकतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Budgujar's cotton field.
Dhule Agriculture Scam : जिल्हा कृषी यंत्रणेत ‘कुंपणच शेत खाते तेव्हा... नातेवाइकांआडून थाटला व्यवसाय!

त्याच्याने वाळवी लागत नाही व त्याच्या वासाने पक्षी येतात व पिकांवर पडलेल्या अळ्या व किडे नष्ट करतात. उत्पन्न कमी येत असले तरी खर्च कमी आहे व रसायनमुक्त पीक घेतल्याचे समाधान त्यांना आहे. सुरवातीची दोन वर्षे उत्पन्न कमी आले; परंतु ते खचले नाहीत व नैसर्गिक शेतीवर भर दिला.

शेणखतावर अधिक भर

श्री. बडगुजर यांच्याकडे दोन बैलजोड्या, दोन गायी, दोन ट्रॅक्टर व दोन सालदार आहेत. घरच्या पशुधनाचेच शेणखत ते शेतात वापरतात. मशागतीवर पूर्ण जोर देतात. श्री. बडगुजर यांची तीन एकर क्षेत्रात फळबाग आहे. त्यात ३०० लिंबू, ५० आंबा, ५० सीताफळ, ५० रामफळ, ५० पेरू अशी झाडे आहेत. श्री. बडगुजर यांचे वय आज ५५ वर्षे आहे. त्यांनी इतिहासामध्ये एमए केले आहे.

"शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीत बदल करून नैसर्गिक शाश्‍वत शेतीची कास धरावी, आजच्या शेती व पीकलागवडीत खतांचा, रसायनांचा अतिरिक्त वापर होतोय, याचा शरीरावर विपरीत परिणाम होतात. नैसर्गिक शेती करणे काळाची गरज आहे.

अन्नधान्यातील घटक विविध आजार व विकार निर्माणास कारणीभूत आहेत. येणारी पिढी निरोगी व सुदृढ व्हायची असेल, तर सकस व जीवनसत्त्वयुक्त आहार त्यांना दिला पाहिजे त्यासाठी रसायनमुक्त शेती करणे गरजेचे आहे." -राजेंद्र धुडकू बडगुजर, प्रगतिशील शेतकरी, शिंदखेडा

Budgujar's cotton field.
Jalgaon Agriculture News : खानदेशातील शेतकऱ्यांची पांढऱ्या सोन्याला पसंती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com