"स्लिपर' प्रवास स्वस्तात; तरी प्रवाशांची प्रतीक्षाच! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

"स्लिपर कम सिटर' विनावातानुकूलित बससेवेत आणल्या आहेत. महामंडळाच्या ताफ्यात यापूर्वी आलेल्या स्लिपर शिवशाही वातानुकूलित बस ही प्रवास भाड्यासाठी न परवडणारी आहे.

जळगाव : "एसटी'ची नवीन विना वातानुकूलित "स्लिपर कम सिटर' रातराणी बस "एसटी'च्या ताफ्यात आली आहे. या बससेवेमधून प्रवाशांना कमी भाड्यात स्लिपर प्रवास करता येत आहे. असे असताना देखील या बससेवेसाठी प्रवाशांची प्रतीक्षा करावी लागत आहे. मुळात सध्या प्रवाशांच्या गर्दीचा हंगाम कमी असल्याने बस रिकाम्याच धावत आहेत. 
एसटी'च्या ताफ्यात साध्या, जलद, रातराणी, हिरकणी, वातानुकूलित शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध अशा विविध बस आहेत. रात्रीच्या वेळेस लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांकडून स्लिपर बसेसला प्राधान्य देतात. तसेच मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना "पुशबॅक' आसन व्यवस्था उपयुक्त ठरते. या पार्श्‍वभूमीवर महामंडळात नवीन बांधणीची सिटर आणि स्लिपर अशा दोन्ही सुविधा असलेली "स्लिपर कम सिटर' ही रातराणी बससेवा सुरू केली आहे. जळगाव विभागात चार बस प्राप्त झाल्या असून, जळगाव आणि चोपडा आगारात या बस आहेत. जळगाव- पुणे अशी फेरी सुरू करण्यात आली आहे. 

शिवशाहीच्या तुलनेत परवडणारी 
"स्लिपर कम सिटर' विनावातानुकूलित बससेवेत आणल्या आहेत. महामंडळाच्या ताफ्यात यापूर्वी आलेल्या स्लिपर शिवशाही वातानुकूलित बस ही प्रवास भाड्यासाठी न परवडणारी आहे. खासगी ट्रॅव्हल्स्‌च्या तुलनेत भाडे अधिक असल्याने शिवशाहीमधून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमीच आहे. यावर पर्याय असलेली "स्लिपर कम सिटर' ही बस कमी म्हणजेच साध्या बसच्या भाड्यात प्रवाशांना घेऊन जाणारी ठरत आहे. या बसमधील स्लिपर आसनसाठी सिटिंगच्या आसनाचेच भाडे लागणार आहे. जळगाव- पुणे मार्गावर धावत असून, साध्या बसच्या भाड्यात प्रवाशांना जाण्याची संधी आहे. 

प्रवासी भाडे (शिवशाही व स्लिपर कम सिटर) 
शहर................शिवशाही...........स्लिपर कम सिटर 
औरंगाबाद..........335.............285 
नगर..................560.............475 
पुणे (शिवाजीनगर)...795............680 
चिंचवड...............820............700 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parivahan mahamandal sliper bus non ac jalgaon news