काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत बहुसंख्येने सहभागी व्हा : भालके

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत बहुसंख्येने सहभागी व्हा : भालके

मंगळवेढा : सध्या सरकारकडून जनसामान्यांच्या विरोधात निर्णय घेतल्याने दलित, मुस्लिम, धनगर, मराठा, भटक्या विमुक्त समाजावर अन्याय झाला. याशिवाय शेतकरीविरोधी धोरणे राबवून शेतकरी, लहान उघोजक, बेरोजगार युवकांना फसविले जात असल्याने या धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आयोजित जनसंघर्ष यात्रेत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन आमदार भारत भालके यांनी केले.

सरकारच्या धोरणांचा निषेध करत जनतेमध्ये जागृती व्हावी, यासाठी काँगेसच्या वतीने सुरू केलेली जनसंघर्ष यात्रा 4 सप्टेंबर रोजी मंगळवेढ्यात येत आहे  त्यासाठीच्या नियोजनासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष सुरेश कोळेकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, शहराध्यक्ष मारूती वाकडे, प स सदस्य नितीन पाटील, रमेश भांजे, ईश्वर गडदे, जि. प सदस्य, नितीन नकाते, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन पाटील, भारत नागणे ,सुजित कदम, महादेव जाधव, संकेत खटके, दादा टाकणे, सचिन शिंदे, युवराज शिंदे ,दिलीप जाधव  हिम्मतराव भाकरे,धनंजय पाटील , महेश दत्तू , निकीता पाटील,मुरलीधर घुले अजित यादव नाथा ऐवळे आदी उपस्थित होते.

भालके म्हणाले, की देशात आणि राज्यात भाजप-सेनेची सत्ता असूनही या सरकारकडून जनहितविरोधी निर्णय घेऊन हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे. ही जनसंघर्ष यात्रा यशस्वी करण्याचे आवाहन करत या संघर्ष यात्रेला मल्लिकार्जुन खरगे,अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे,राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील बाळासाहेब थोरात, रजनीताई पाटील,रामहरी रूपनर,सिद्धाराम म्हेत्रे, आ प्रणिती ताई शिंदे प्रकाश पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

4 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता जनसंघर्ष यात्रेचे स्वागत दामाजी चौकात होणार असून, यावेळी दामाजीच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेद्वारे रॅली निघणार असून मारुतीच्या पटांगणात जाहीर सभा होणार असल्याचे भालके म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com