न्हावी : ‘मेमू ट्रेनच्या' कमी डब्यांमुळे प्रवाशांची होतेय गैरसोय | latest jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MEMU Train

‘मेमू ट्रेनच्या' कमी डब्यांमुळे प्रवाशांची होतेय गैरसोय

न्हावी (जि. जळगाव) : सर्वसामान्यांची जीवन वाहिनी म्हणून रेल्वेकडे बघितले जाते. परंतु सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण फुल्ल आहेत तर जनरल तिकीटही मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच भुसावळ - इगतपुरी (मेमू ट्रेन) रेल्वेने प्रवाशांना आपल्या मुलांबाळासह उभ्याने प्रवास करावा लागत आहे. भुसावळ येथून सुटलेली ही गाडी प्रत्येक स्थानकावर थांबत असल्याने खच्चून गर्दी होत आहे, शिवाय मेमू गाडीला डबे कमी असल्याने प्रवाशांची आणखीनच गैरसोय होत आहे.

कोरोना काळात देशातील सर्वच सेवा बंद होत्या. त्यात रेल्वेसेवा देखील बंद होती. कोरोना आटोक्यात आल्यानंतर रेल्वेसेवा देखील हळूहळू पूर्वपदावर आली. त्यामुळे कोरोना काळात इतर ठिकाणी जाता न आल्याने यंदाच्या उन्हाळी सुट्यांमध्ये आई, वडील आपल्या मुलांसह देशभरातील विविध पर्यटन स्थळे पाहण्यासाठी मिळेल त्या गाडीने प्रवास करीत आहेत.

कोरोनाच्या अगोदर भुसावळ येथून सकाळी आणि सायंकाळी देवळाली तसेच मुंबई पॅसेंजर गाडी सुरू होती. परंतु आता मात्र एकच मेमू ट्रेन सुरू असल्याने आणि ती सुद्धा कमी डब्यांची असल्याने प्रवासी संख्येच्या तुलनेत ती कमी पडत आहे. वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता रेल्वे विभाग तसेच खासदारांनी प्रवाशांची ही होणारी गैरसोय लक्षात घेता जास्त डब्यांची पॅसेंजर किंवा ‘मेमू’ला जास्तीचे डबे जोडण्यात यावे, अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशांकडून होत आहे.

हेही वाचा: खबरदार! रात्री दहानंतर डीजे वाजवाल तर... पोलिसांचा कारवाईचा इशारा

मी अकोला जाण्यासाठी भुसावळ येथून मेमू ट्रेनमध्ये (Memu Train) बसलो. भुसावळ येथून बसल्यावर मला जागा मिळाली. परंतु पुढे मलकापूरपासून गर्दी वाढत गेल्याने पुढील प्रवाशांना आपल्या मुलांबाळासह उभे राहून प्रवास करावा लागला. पूर्वीसारखी पॅसेंजर किंवा मेमू ट्रेनला जास्त डबे जोडण्यात यावे, तसेच सुपर फास्ट गाड्यांचे तिकीट पहिल्यासारखे सुरू करावे.

- गणेश वाणी, प्रवासी

हेही वाचा: ‘मेमू’ने दौंड -लोणावळा आता थेट प्रवास

मी इगतपुरी - भुसावळ मेमू ट्रेनने नाशिकवरून भुसावळ येण्यासाठी निघालो असताना मला परिवारासह चाळीसगावपर्यंत उभे राहून प्रवास करावा लागला. लग्नसराई, सुट्ट्यांमुळे प्रत्येक स्थानकावर गर्दी वाढत असून, लोकप्रतिनिधींनी याबाबत लक्ष द्यावे.

- संजय बारी, प्रवासी

Web Title: Passengers Trouble Due To Low Number Of Bins Memu Train In Nhavi Jalgaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top