पेट्रोल दरवाढीविरोधात  दुचाकीची अंत्ययात्रा 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 मे 2018

पेट्रोल दरवाढीविरोधात 
दुचाकीची अंत्ययात्रा 

जळगाव  : पंधरा दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या पेट्रोल- डिझेल दरवाढीच्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेत दुचाकीची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. अंत्ययात्रेत दुचाकी तिरडीवर ठेवत अनोखे आंदोलन केले. ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. 

दररोज पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत असून, रोजच्या जीवनाचा भाग बनलेले पेट्रोल 86 रुपये लिटर झाले आहे. वर्षभरात पेट्रोलच्या दरात दहा रुपयांची वाढ झाली असून, त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. इंधन दरवाढीसोबत वाहतुकीच्या खर्चातही वाढ झाल्याने बाजारपेठेत महागाई वाढली आहे. 
पेट्रोल दरवाढीने दुचाकी चालविणे कठीण झाले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आज "मनसे'ने आकाशवाणी चौकातून दुचाकीची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. या अनोख्या आंदोलनात दुचाकी तिरडीवर ठेवत कार्यकर्त्यांनी उपरोधिकपणे रडत निषेध केला. आंदोलनात "मनसे'चे जिल्हा सचिव जमील देशपांडे, महानगराध्यक्ष वीरेश पाटील, विनोद शिंदे, अविनाश पाटील, संजय नन्नवरे, संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. 

Web Title: petrol