Pankaja Munde
sakal
वार्सा: केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने पिंपळनेरच्या रस्त्यांसाठी निधीचा तुटवडा भासू देणार नाही, असे आश्वासन राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. पिंपळनेर (ता. साक्री) नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा आणि नगरसेवकपदाच्या उमेदवारांसाठी विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मंत्री मुंडे बोलत होत्या. विकासाच्या विजयाची माळ भाजपच्या गळ्यात पडेल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.