Orchard Grant Announced : जुन्या फळबाग पुनरुज्जीवनासाठी योजना; | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Integrated Horticulture Development Mission

Orchard Grant Announced : जुन्या फळबाग पुनरुज्जीवनासाठी योजना!

धुळे : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२२-२३ अंतर्गत क्षेत्र विस्तार कार्यक्रम फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन आदींसाठी महाडीबीटी या ऑनलाइन प्रणालीवर अर्ज मागविण्यात आले आहेत. (Plans for revitalizing old orchards Demand for application from farmers through MahaDBT online system Dhule news)

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विदेशी फळे, फुले, मसाला लागवड, आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या जुन्या बागांचे पुनरुज्जीवन समाविष्ट आहे. विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता

वाढविणे या दृष्टीने प्रयत्न आहेत. या घटकांचे अनुदान असे ः घटक- फळे लागवड, कट फ्लॉवर्स, अल्पभूधारक शेतकरी, खर्चमर्यादा एक लाख प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ४० हजार प्रतिहेक्टर, घटक- इतर शेतकरी, खर्चमर्यादा- एक लाख प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल २५ हजार प्रतिहेक्टर, कंदवर्गीय फुले, अल्पभूधारक शेतकरी, खर्चमर्यादा- दीड लाख प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ६० हजार प्रतिहेक्टर.

घटक- इतर शेतकरी, खर्चमर्यादा- दीड लाख प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल ३७ हजार पाचशे प्रतिहेक्टर, घटक- सुटी फुले, अल्पभूधारक शेतकरी, खर्चमर्यादा- ४० हजार प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल १६ हजार प्रतिहेक्टर, घटक- इतर शेतकरी, खर्चमर्यादा- ४० हजार प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल १० हजार प्रतिहेक्टर, घटक- मसाला पीकलागवड, बियावर्गीय व कंदवर्गीय मसाला पिके, खर्चमर्यादा- ३० हजार प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के रक्कम १२ हजार प्रतिहेक्टर,

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

हेही वाचा: Cotton News : कापसाचा साठा केल्याने झाला वांधा; जिनींग प्रेसिंग मिल बंद ठेवण्याची वेळ

घटक- विदेश फळपीक लागवड, ड्रॅगन फ्रूट, अंजीर व किवी, खर्चमर्यादा- चार लाख प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल एक लाख ६० हजार प्रतिहेक्टर, घटक- पॅशनफ्रूट, ब्लुबेरी, तेंदुफळ व ॲव्हॅकॅडो, खर्चमर्यादा- एक लाख प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ४० हजार प्रतिहेक्टर, घटक- जन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, खर्चमर्यादा- ४० हजार प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या ५० टक्के कमाल २०

हजार प्रतिहेक्टर.

योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी https://mahadbtmahait.gov.in/farmer/login संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. सातबारा उतारा, ८- अ, आधारकार्ड झेरॉक्स, आधारकार्ड संलग्न बँक पासबुकची झेरॉक्स, संवर्ग (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती) प्रमाणपत्र झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचा सद्यःस्थितीचा फोटो, हमीपत्र, स्थळपाहणी अहवाल सादर करावा. शेतकऱ्यांना संपर्काचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले.

हेही वाचा: Gram Panchayat Election 2022 : सिन्नरला 12 ग्रामपंचायतीसाठी 82 टक्के मतदान!