PM Awas Yojana : प्रधानमंत्री आवासच्या लाभार्थ्यांच्या विनवण्या!

PM Awas Yojana
PM Awas Yojanasakal

धुळे : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांकडून बांधकाम (Construction) परवानगी घेण्यास प्रतिसाद मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मेळावा आयोजित केला. या मेळाव्यालाही लाभार्थ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. (pm awas yojana Time to contact concerned beneficiaries on municipal system make request for necessary fulfillment dhule news)

त्यामुळे पुन्हा एकदा मनपा यंत्रणेवर संबंधित लाभार्थ्यांशी संपर्क करून आवश्‍यक पूर्तता करून घेण्यासाठी विनंती करण्याची वेळ आली आहे.

सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. या योजनेत विविध घटकांतून लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी अनुदान, मदत देण्यात येत आहे. योजनेतील घटक क्रमांक ४ अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपात घरकुल बांधण्यासाठी अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते.

या घटकात धुळे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील एक हजार १०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. मात्र, यातील निम्म्या लाभार्थ्यांनी नोटिसा बजावून, संपर्क साधून अद्यापही बांधकाम परवानगीच घेतलेली नाही.

त्यामुळे पुढील कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी या योजनेचे उद्दिष्ट, उद्देशही शहरात सफल होताना दिसत नाही. त्यामुळे शासनाच्या वरिष्ठ स्तरावरून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने ३ फेब्रुवारीला महापालिकेच्या जुन्या इमारतीत मेळावा आयोजित केला होता.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

PM Awas Yojana
Nashik News : Citylincचा तोटा भरण्यासाठी 85 कोटी तरतूद करण्याची मागणी

१५० लाभार्थी उपस्थित

बांधकाम परवानगीच्या अनुषंगाने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आयोजित या मेळाव्यालाही लाभार्थ्यांकडून अपेक्षेनुसार प्रतिसाद मिळाला नाही. या मेळाव्याला साधारण १५० लाभार्थ्यांनी हजेरी लावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यातूनही काही प्रकरणे क्लिष्ट असल्याचे सांगण्यात येते.

त्यामुळे यातून किती लाभार्थ्यांची प्रकरणे पुढे सरकतील हा प्रश्‍नच आहे. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीतील अडथळे कायम असल्याचेच पाहायला मिळते. दरम्यान, मेळाव्यालादेखील जे लाभार्थी हजर राहिले नाहीत, त्यांना पुन्हा मनपाच्या संबंधित यंत्रणेकडून संपर्क साधण्याचे काम सुरू आहे.

योजना जाहीर झाल्यानंतर योजनेच्या लाभासाठी ज्या प्रमाणात नागरिकांची अर्ज घेण्यासाठी झुंबड उडाली होती, त्या तुलनेत योजनेच्या प्रत्यक्ष लाभाबाबत मात्र विरोधाभासी चित्र पाहायला मिळत आहे.

PM Awas Yojana
Sunny Salve Case : सनी साळवे खून खटल्यातील दोघांचे जामीन अर्ज नामंजूर

दरम्यान, जे लाभार्थी प्रतिसाद देत नाहीत त्यांची नावेच या योजनेतून वगळण्याचा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात नेमकी काय कार्यवाही होते याकडे लक्ष असणार आहे.

इतर घटकांचे काय?

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत वैयक्तिक स्वरूपात अनुदानाच्या घटकाव्यतिरिक्त इतर घटकांतूनही लाभ देण्यात येतो. या इतर घटकांबाबतही महापालिकेकडून कार्यवाही करण्यात आली, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याचे अद्यापही दिसून आलेले नाही. याबाबत नेमकी स्थितीही समोर येताना दिसत नाही. त्यामुळे संपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने धुळे शहरात फारसे समाधानकारक चित्र नसल्याचेच दिसते.

PM Awas Yojana
Dhule News : पदाधिकारी पती, अधिकारी यांच्यात जोरदार वादावादी; महापालिकेतील प्रकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com