Dhule News : पदाधिकारी पती, अधिकारी यांच्यात जोरदार वादावादी; महापालिकेतील प्रकार

Dhule municipal corporation news
Dhule municipal corporation newsesakal

धुळे : महापालिकेत मंगळवारी (ता. ७) एका पदाधिकाऱ्याचे पती व वरिष्ठ अधिकारी (Senior Officer) यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समजली. हा वाद नंतर महापालिकेबाहेर गेल्याने चर्चा रंगल्या. (strong verbal argument took place between husband of an office bearer senior officer in Municipal Corporation dhule news)

दरम्यान, या वादानंतर संबंधित अधिकाऱ्याने आयुक्तांना पत्र देत आपल्याकडील एका विभागाची जबाबदारी काढून घेण्याची विनंती केल्याचेही समजते.

धुळे महापालिकेत सर्व काही सुरळीत सुरू आहे, असे कुणी म्हटले तर त्यावर किती विश्‍वास ठेवायचा, असा प्रश्‍न पडतो. कारण एक ना अनेक भानगडी महापालिकेत पाहायला मिळतात. त्यातून प्रशासनासह पदाधिकारी, नगरसेवकांची प्रतिमा मलिन होते. अर्थात यात सर्वच वाईट आहेत असे नाही.

पण, यामुळे महापालिकेच्या कारभारावर कुणाचा वचक नाही असेच चित्र समोर येते. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता असल्याने साधारण महिनाभर महापालिकेत शांतता होती. आता निवडणूक संपल्याने पुन्हा गजबज सुरू झाली आहे.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Dhule municipal corporation news
Sunny Salve Case : सनी साळवे खून खटल्यातील दोघांचे जामीन अर्ज नामंजूर

यातच मंगळवारी (ता. ६) एक वरिष्ठ अधिकारी व महापालिकेतील एका पदाधिकाऱ्याचे पती यांच्यात जोरदार शाब्दिक वादावादी झाला. हा वाद अगदी अर्वाच्य भाषेपर्यंत पोचल्याचेही सूत्रांकडून समजले. या वादाची चर्चा नंतर महापालिकेबाहेरही गेल्याने चर्चा रंगल्या.

अधिकाऱ्याचे पत्र

वादानंतर संबंधित अधिकाऱ्याने थेट आयुक्तांना पत्र देत एका विभागाची आपल्याकडून जबाबदारी काढून घेण्याची विनंती केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे हा वाद साधासुधा नव्हता हेच यातून स्पष्ट होते.

आता हा वाद नेमका कशामुळे झाला यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत. संबंधित अधिकाऱ्याने एका विभागाची जबाबदारी काढून घेण्याबाबत आयुक्तांना पत्र दिले याचा अर्थ संबंधित विभागाच्या अनुषंगाने काहीतरी प्रकरण या वादाचे कारण आहे असे दिसते. त्यातही नेमके काय घडले हे मात्र समजू शकले नाही.

Dhule municipal corporation news
Nashik News : Citylincचा तोटा भरण्यासाठी 85 कोटी तरतूद करण्याची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com