Nandurbar : PM नरेंद्र मोदींनी साधला लाभार्थ्यांशी संवाद | latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP present in the dialogue program at the collector's office Dr. Hina Gavit, Dist. W. Member Dr. Supriya Gavit, Officer and Beneficiary.

Nandurbar : PM नरेंद्र मोदींनी साधला लाभार्थ्यांशी संवाद

नंदुरबार : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालय व राज्य ऊर्जा विभागाकडून आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य पॉवर २०४७ या ऊर्जा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उर्जा विभागाच्या विविध योजनांच्या देशभरातील निवडक लाभार्थ्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात करण्यात आली होती. (PM Narendra Modi interacted with beneficiaries in ujjwal bharat ujjwal bhavishya program Nandurbar Latest Marathi News)

यावेळी खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषद सदस्या डॉ. सुप्रिया गावित, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, महावितरणचे अधिक्षक अभियंता अनिल बोरसे, पीएफसी नंदुरबारचे नोडल अधिकारी सुमीत बंसल, उपकार्यकारी अभियंता विकास खाचणे, ऊर्जा विभागाच्या योजनांचे लाभार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

यावेळी केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकरी व नागरिकांसाठी पंतप्रधान सहज बिजली हर घर योजना (सौभाग्य योजना), मुख्यमंत्री सौर कृषी योजना, पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक ऊर्जा विकास योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना, कृषी पंप वीज धोरण २०२०, (स्व.) विलासराव देशमुख अभय योजना, अशा विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असून, या योजनांविषयी लाभार्थ्यांनी पंतप्रधान श्री. मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.

खासदार डॉ. हीना गावित यांनी या कार्यक्रमानंतर ऊर्जा विभागाच्या या सर्व योजनांचा थोडक्यात आढावा घेऊन जिल्ह्यातील सद्य:स्थितीबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.