
एक महिला पोलिस साध्या वेशात नाशिक रोड बसस्थानकात थांबल्या होत्या. त्या वेळी संशयित दीपक जगताप त्यांच्या दिशेने आला आणि जवळ येऊन त्याने रिक्षाथांब्याकडे येण्याचा इशारा केला आणि "चालते का?' असे म्हणत अश्लील हावभाव केले.
नाशिक : नाशिक रोड बसस्थानक परिसरात बुधवारी (ता. 25) रात्री दहा ते बारादरम्यान, पोलिस आयुक्तालयाच्या निर्भया पथक-4 च्या महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचला.
अशी घडली घटना..
एक महिला पोलिस साध्या वेशात नाशिक रोड बसस्थानकात थांबल्या होत्या. त्या वेळी संशयित दीपक जगताप त्यांच्या दिशेने आला आणि जवळ येऊन त्याने रिक्षाथांब्याकडे येण्याचा इशारा केला आणि "चालते का?' असे म्हणत अश्लील हावभाव केले. त्या वेळी साध्या वेशात असलेल्या निर्भया पथक व नाशिक रोड पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. या प्रकारचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे. संशयित दीपक याच्याविरोधात नाशिक रोड पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली. ही कामगिरी निर्भया पथकाच्या महिला उपनिरीक्षक श्रद्धा गंधास, महिला पोलिस प्रेरणा शेळके, कैलास पवार, मच्छिंद्र जाधव यांच्यासह नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी बजावली
हेही वाचा > ...यामुळे तीन दिवसांच्या तान्हया बाळाला सोडून आई..."माता न तू वैरिणी"
अश्लील हावभाव त्यालाच नडले...
दोन दिवसांपासून पोलिस आयुक्तालयाच्या निर्भया पथकातील महिला अधिकाऱ्यांकडून रात्रीच्या वेळी बसस्थानक परिसरात छेडखानी करणाऱ्या "स्थानकसख्यां'ना बेड्या ठोकल्या असता, त्यात आणखी एकाची भर पडली आहे. नाशिक रोड बसस्थानकावर 42 वर्षीय "स्थानकसख्या'ला अटक करण्यात येऊन नाशिक रोड पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. दीपक गुलाबराव जगताप (42, रा. पौर्णिमा बसस्टॉपच्या मागे, द्वारका) असे संशयित "स्थानकसख्या'चे नाव आहे.
हेही वाचा- सिझर नाकारले अन् गर्भपिशवी फाटून तिचा मृत्यू