
Police Recruitment : अल्पसंख्याकांसाठी 'या' तारखेला पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण निवड चाचणी
नंदुरबार : अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांनी पोलिस शिपाई (police constable) भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या निवडचाचणीसाठी १५ मार्च २०२३ ला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे. (Police Pre Recruitment Training Selection Test for Minorities on 15 march 2023 nandurbar news)
मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन व ज्यू अशा अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब प्रतिष्ठान, नंदुरबार या प्रशिक्षण संस्थेची निवड झाली आहे.
प्रशिक्षणासाठी उमेदवार शारीरिक दृष्टीने निरोगी असावा. उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त नसावे. उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा, वय १८ ते २५ वयोगटातील असावे. यापूर्वी उमेदवाराने शासन अनुदानित संस्थेकडून पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेतलेले नसावे.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
अर्जासोबत उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयांतर्गत नावनोंदणी दाखला, ओळखपत्र, आधारकार्ड, बँक खाते पासबुक इत्यादी कागदपत्राच्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडले आवश्यक राहील.
प्रशिक्षणास इच्छुक असलेल्या अल्पसंख्याक उमेदवारांनी १५ मार्च २०२३ ला सकाळी अकराला जिल्हा क्रीडासंकुल मैदान, नंदुरबार येथे कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.