नगरदेवळा (ता. पाचोरा)- गाळण खुर्द (ता. पाचोरा) येथे अवैधरीत्या गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती येथील पोलिसांना समजताच गुरुवारी (ता. २७) सकाळी आठच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने छापा टाकून केलेल्या कारवाईत हातभट्टी उद्ध्वस्त करून मिळून आलेली दारू व रसायन नष्ट केले. या कारवाईचे विशेषतः महिलांमधून कौतुक होत आहे.