'यामुळे' पक्षांच्या कार्यालयांवर पोलिसांचा बंदोबस्त.. 

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 24 November 2019

भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मनसेच्या कार्यालयाला शनिवारी (ता. 23) दिवसभर पोलिसांचा गराडा होता. भाजप कार्यालय म्हणजे पोलिस ठाणेच आहे की काय, अशी स्थिती होती.  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही आमदारांनी भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडल्याने त्यातही सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांना धमक्‍यांचे सत्र सुरू झाले आहे. त्यातून शहरात संवेदनशील परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी सर्वच राजकीय पक्षांच्या मुख्य कार्यालयांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही आमदारांनी भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडल्याने त्यातही सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांना धमक्‍यांचे सत्र सुरू झाले आहे. त्यातून शहरात संवेदनशील परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी सर्वच राजकीय पक्षांच्या मुख्य कार्यालयांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मनसेच्या कार्यालयाला शनिवारी (ता. 23) दिवसभर पोलिसांचा गराडा होता. भाजप कार्यालय म्हणजे पोलिस ठाणेच आहे की काय, अशी स्थिती होती. 

बदलत्या राजकीय घडामोडींमुळे निर्णय 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही आमदारांसोबत भाजपचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर सर्वच क्षेत्रांत खळबळ उडाली. राजकीय क्षेत्र ढवळून निघाल्याने कार्यकर्ते संभ्रमात सापडले. भाजपमध्ये आनंदोत्सवाचे वातावरण, तर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली. त्या पार्श्‍वभूमीवर शहरात संवेदनशील वातावरण निर्माण झाले. यातून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर शनिवारी दिवसभर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाजप कार्यालयावर सर्वाधिक मोठा पोलिसांचा ताफा होता. त्याखालोखाल शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयावर पोलिस बंदोबस्त होता. मनसे व कॉंग्रेस कार्यालयावर दोन-तीन पोलिस तैनात करण्यात आले होते. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांसाठीदेखील पोलिसांचा बंदोबस्त होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police settlement at party offices Nashik News