esakal | महाशिवआघाडीत सहभागावरून मनसेत दोन गट? 
sakal

बोलून बातमी शोधा

mns 1111.jpg

भाजपला सत्तेपासून रोखायचे असेल, तरी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, यावरून नाशिकमध्ये मनसेत दोन गट निर्माण झाले आहेत. पक्षाचे सरचिटणीस डॉ. प्रदीप पवार व माजी महापौर अशोक मुर्तडक यांची शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका असल्याचे बोलले जात आहे. ऍड. वैशाली भोसले यांच्याकडून महाआघाडीत सहभागी होताना मोठे पदरात पाडून शहरात पक्षाची ताकद वाढविण्याची संधी असल्याची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. सलीम शेख, नंदिनी बोडके व योगेश शेवरे यांच्याकडून भाजपला पसंती देण्याची भूमिका मांडली जात असल्याचे समजते. त्यामुळे एकीकडे भाजपला रोखण्यासाठी महाशिवआघाडी स्थापन होत असताना मनसेच्या भूमिकेमुळे ट्विस्ट निर्माण होण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. 

महाशिवआघाडीत सहभागावरून मनसेत दोन गट? 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत एकमत असले तरी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली तयार होणाऱ्या महाशिवआघाडीत सहभागी होण्यावरून दोन गट निर्माण झाले आहेत. एक गट शिवसेनेसोबत जाण्यास, तर दुसरा गट भाजपबरोबर जाण्याच्या मानसिकतेत असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेत मनसेचे पाच सदस्य, तर एका अपक्षाच्या मदतीने विभागीय आयुक्तांकडे सहा नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे स्थायी समितीत मनसेला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. परंतु आता महापालिकेत सत्तांतर होत असताना मनसेची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. 

एक गट भाजपच्या बाजूने; भूमिका महत्त्वाची 
भाजपला सत्तेपासून रोखायचे असेल, तरी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, यावरून दोन गट निर्माण झाले आहेत. पक्षाचे सरचिटणीस डॉ. प्रदीप पवार व माजी महापौर अशोक मुर्तडक यांची शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका असल्याचे बोलले जात आहे. ऍड. वैशाली भोसले यांच्याकडून महाआघाडीत सहभागी होताना मोठे पदरात पाडून शहरात पक्षाची ताकद वाढविण्याची संधी असल्याची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. सलीम शेख, नंदिनी बोडके व योगेश शेवरे यांच्याकडून भाजपला पसंती देण्याची भूमिका मांडली जात असल्याचे समजते. त्यामुळे एकीकडे भाजपला रोखण्यासाठी महाशिवआघाडी स्थापन होत असताना मनसेच्या भूमिकेमुळे ट्विस्ट निर्माण होण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. 

भाजपला मदतीवरून अडचण 
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपविरोधात प्रचाराची राळ उठविली होती. राज्यात राज ठाकरे यांच्या सभेने मोठा कल्लोळ माजविला होता. भाजपविरोधात भूमिका घेतली असताना महापालिकेत भाजपला मदत केल्यास पक्षासाठी अडचण ठरणार असल्याने भाजपला मदत मिळण्याची शक्‍यता धूसर असल्याचे मनसेच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. त्यापेक्षा तटस्थ भूमिका घेण्याचा मध्यम मार्ग घेतला जाण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

loading image