Dhule Municipal Election
sakal
धुळे: महापालिकेच्या यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंदा इच्छुक उमेदवारांची प्रचंड झुंबड पाहायला मिळाली. मात्र, मागील पंचवार्षिक निवडणुकीचे चित्र पाहता ही स्पर्धा एका अर्थाने फिकीच पडली. कारण, २०१८ च्या महापालिका निवडणुकीच्या रिंगणात तब्बल ३५५ उमेदवार होते. यंदा प्रचंड स्पर्धेचे चित्र निर्माण झाले, तरी एकूण ३२० उमेदवार रिंगणात उतरले, अर्थात मागील निवडणुकीपेक्षा ३५ उमेदवार यंदा कमी आहेत. तसेच, प्रत्यक्ष निवडणुकीच्या लढाईत मागील निवडणुकीच्या तुलनेत या वेळी राजकीय पक्षांसह अपक्षांची संख्याही घटली आहे, हे विशेष.