Dhule News: देऊरला रानडुकरांकडून डाळिंब बागेचे नुकसान; साडेसहा एकर क्षेत्रातील डाळिंबांचा फडशा

Pomegranates gnawed by wild boars in the garden of Digambar Deore at Deur Khurd (Dhule).
Pomegranates gnawed by wild boars in the garden of Digambar Deore at Deur Khurd (Dhule).esakal

Dhule News : यंदा फळ पिकात डाळिंबाला सुगीचे दिवस आहेत. नैसर्गिक संकटाचा सामना करत शेतकऱ्यांनी डाळिंबबागा जतन केल्या. मात्र, ‘दैव देत आणि कर्म नेते' असे म्हणण्या ऐवजी आता निसर्गानं दिलं आणि रानडुकरांनी उद्ध्वस्त केलं, अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

लाखो रुपये खर्च करत उभे केलेले डाळिंब पिकांचा रानडुकरे फडशा पाडत आहेत. देऊर खुर्द (ता. धुळे) येथील शिवारात साडेसहा एकरातील डाळिंब बागेतील नुकसानीमुळे शेतकरी कुटुंब हतबल झाले आहे. (Pomegranate orchards damaged by wild boars at Deur six half acre orchard of pomegranates Dhule News)

यंदा जिल्ह्यात आजही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. भीजपावसात पेरण्या झाल्या आहेत. दुसरीकडे काढणीवर आलेल्या डाळिंब बागांची राखण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे.

देऊर बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी दिगंबर देवरे यांचे गट क्रमांक १६१ पैकी दोनमध्ये साडेसहा एकर क्षेत्रात डाळिंब बाग आहे. सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक झाडे आहेत. डांळिब बाग काढणीवर आली असून, तयार फळे रानडुकरे घशात घालत आहेत. जमिनीलगतची अथवा उभे झाड आडवे करत फडशा पाडत आहेत.

रात्री रानडुकरांचा कळप डाळिंब बागांचा फडशा पाडत आहे. देऊरचे कृषी सहाय्यक किरण देवरे, वनपाल पी. एच. पाटील, वनरक्षक ज्ञानेश्वर बागले व वन कर्मचाऱ्यांनी आदींनी भेट देत पंचनामा केला.

पंधरा दिवसांपासून रोज रानडुकरे नुकसान करत आहेत. सुमारे साडेपाच लाखांचे नुकसान झाल्याचे शेतकरी दिगंबर देवरे व माजी हेमांगी देवरे यांनी सांगितले. नुकसान अधिक आणि मदत तुटपुंजी दिली जात असल्याने शेतकऱ्यांनी व्यथा कुणाकडे मांडावी, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

पावसाने मोठी ओढ दिल्याने बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. दुसरीकडे हातातोंडाशी आलेला घास रानडुकरे हिरावून नेत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Pomegranates gnawed by wild boars in the garden of Digambar Deore at Deur Khurd (Dhule).
Medical Admission: वैद्यकीयच्या प्रवेशासाठी नोंदणी आजपासून; सविस्‍तर वेळापत्रकाची प्रतीक्षा कायम

काळगाव शिवारात बहुतेक शेतकऱ्यांच्या डाळिंब बागा आहेत. काळगावलगत मोठे वनक्षेत्र असल्याने वन्यपशूंसह रानडुकरांचा मुक्त संचार आहे. काळगाव येथील प्रत्येक शेतकरी डाळिंब बागेत खडा पहारा देत आहेत.

बागेच्या चौफेर रक्षणासाठी रात्रभर खडा पहारा देण्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकरी सांगतात. रात्री रानडुकरे कळपाने शिरत उभ्या डाळिंब पिकाचा फडशा पाडतात.

"काढणीवर आलेल्या डाळिंब बागांत रानडुकरे नुकसान करत आहेत. कृषी व वन विभाग पंचनामा करत असले अधिक नुकसान होऊनही कमी नुकसान दाखवत आहे. यातून मदत तुटपुंजी मिळू शकते." - दिगंबर देवरे, डाळिंब उत्पादक, देऊर बुद्रुक

"देऊर खुर्द शिवारातील डाळिंब बागेत रानडुकरे मोठे नुकसान करत आहेत. नुकसान अधिक असले तरी भरपाई देण्यासाठी शासकीय निकष आहेत. शासकीय नियमानुसार भरपाई देण्यात येईल."- महेश पाटील, वनक्षेत्रपाल, धुळे तालुका वन विभाग

Pomegranates gnawed by wild boars in the garden of Digambar Deore at Deur Khurd (Dhule).
Dada Bhuse: भजनी मंडळांना सरकारतर्फे मिळणार साहित्य; पालकमंत्री भुसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com